भुवनेश्वर। कलिंगा स्टेडियमवर सुरु असलेल्या 22 व्या आशियाई मैदानी स्पर्धेच्या दुसर्या दिवशी मार्गिका ओलंडल्यामुळे स्पर्धेतून बाद होण्याची नामुष्की भारताच्या चार बाय 100 मिटर रिले संघावर ओढावली. जॉन अनुरुप, व्ही.के.एलाकीया दासन, जे देवनाथ आणि अमियकुमार यांचा समावेश असलेल्या भारतीय रिले संघाने अटितटीच्या शर्यतीत फोटोफिनीशमध्ये कोरियाला मागे टाकले होते, पण नंतर संघाला बाद ठरवण्यात आले.
रिले शर्यतीला सुरुवात झाल्यावर भारतीय धावपटूंनी पहिला आणि दुसरा टप्पा सहज पार केला. मात्र तिसर्या टप्प्यात देवनाथकडून बॅटन हस्तांतर करताना ताळमेळ न राखता आल्यामुळे मलिककडून मार्गिका ओलांडली गेली. शर्यतीत भारतीय संघ तिसर्या मार्गिकेत धावत होता. पण संघ बाद झाल्यामुळे प्रथम क्रमांक कोरियाला देण्यात आला. दुसर्या फेरीत चीनने 39.06 सेकंद कामगिरीसह अव्वल स्थान मिळवले. चायनिज तैपई (39:40 सेकंद) आणि थायलंड (39:48 सेकंद) तिसर्या स्थानावर राहिला. अनु, जौना, अर्पिता अंतिम फेरीत भारताच्या चार महिला धावपटूंनी 400 मीटर हर्डल्स शर्यतीच्या अंतिम फेरीत स्थान मिळविले.