भारतीय सिनेमांवर पाकिस्तानात बंदी !

0

नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० रद्द करण्याचा भारताचा निर्णय पाकिस्तानच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. भारताबरोबर काल व्यापारी संबंध तोडल्यानंतर पाकिस्तानने आज पाकिस्तानच्या चित्रपट गृहात भारतीय सिनेमे दाखविण्यावर बंदी घातली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचे असिस्टंट डॉ.फिरदोस आशिक अवान यांनी ही माहिती दिली आहे. आज सकाळीच पाकिस्तानी माध्यमातून भारत-पाकमध्ये धावणारी समझोता एक्सप्रेस बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले होते, त्यानंतर आता भारतीय सिनेमे दाखविण्यावर बंदी घालण्यात आली आहे.