मुंबई : वादग्रस्त रिऍलिटी शो ‘बिग बॉस १२’ वीकेंड का वार पाहण्यासाठी प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असतात. कारण वीकेंड का वार विथ सलमान खान असतो. या कार्यक्रमात अभिनेता गोविंदा आपल्या ‘फ्राय डे’ चित्रपटाचे प्रमोशन करण्यास येणार आहे.
सलमान खानच्या सेटवर या स्पेशल वीकेंडमध्ये भारती सिंगची एन्ट्री होणार असून त्यात ती कार्यक्रमाला होस्ट करणार आहे. भारतीची घरात एन्ट्री झाल्यानंतर ती घरातील सदस्यांना कठिण टास्क देणार आहे.
या टास्कच्या दरम्यान, भारती सिंगने अनुप जलोटा यांच्यासोबत रोमँटिक डान्स केला. या डान्समुळे स्पर्धकांचे हसून-हसून पोट दुखले.