भारत कृषक समाजातर्फे विवरेत शेतकरी मेळावा

0

विवरा। शेतकर्‍यांच्या सर्वागीन आर्थिक विकासासाठी शेती सोबतच शेतीला पुरक असा जोडधंदा करणे हि काळाची खरी गरज आहे. शेतकर्‍यांना सतत अस्मानी व सुल्तानी संगटाचा सामना करावा लागतो. त्यामुळे शेतकर्‍यांची आर्थिक परिस्थिती नेहमी खालावलेली असते. म्हणून शेतकर्‍यांनी शेतीपुरक कोणताही जोडधंदा करावा. असे आवाहन पी. के.व्ही.चे अरविंद देशमुख यांनी विवरे येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात केले.

भारत कृषक समाजाने शेतकरी मार्गदर्शन मेळावा विवरा येथे चेअरमन डॉ. प्रकाश मानकर यांचे अध्यक्षतेखाली आयोजीत केला होता. यावेळी दुग्ध व्यवसाय व डेअरी बद्दल तसेच दुधापासून बनविण्यात येणारे विविध पदार्थांबाबत सखोल मार्गदर्शन शेतकर्‍यांना शेतीपुरक व्यवसाय करण्यासाठी माहिती शेतकर्‍यांना देण्यात आली. कृषी विभाग व शासकीय योजनांचा पुरेपुर लाभ घेण्याचे आवाहन अध्यक्षीय भाषणातून डॉ. प्रकाश मानकर यांनी केले.

यांची होती उपस्थिती
बालाजी देशमुख, प्रकाश बोराळे, माणिक देठे, चंदु वावकर, श्रीहरि झोडपे, डॉ रमेश क्षिरसागर, देविदास धोत्रे, अमर पजई, संतोष धोत्रे, राजेश बुटे, प्रमोद इंगळे, विनोद राखोडे, दिनेश पजई, मोहन ताले, दिलीप ताले, मंगेश देशमुख, राहुल देशमुख, माधव भारसाकळे, अनिल पोहरे, दिनेश देव, विनोद टिबडेवाल व इतर शेतकरी उपस्थित होते. आभारप्रदर्शन डॉ. रमेश क्षिरसागर यांनी केले. याप्रसंगी तरुणांनी लवकरच मोठी डेअरी उघडण्याचा संकल्प जाहिर केला.