भारत-चीन वादावर आज सर्वपक्षीय नेत्यांची बैठक

0

नवी दिल्ली: भारत-चीन सीमेजवळ गलवान भागात दोन दिवसांपूर्वी दोन्ही देशांच्या सैनिकांत संघर्ष झाला. यात 20 भारतीय जवान शहीद झालेत तर 40 पेक्षा अधिक चिनी सैनिक मारले गेलेत. दरम्यान आज याच वादाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलविली आहे. या बैठकीत देशातील जवळ्पास सर्वच प्रमुख पक्षाचे नेते हजर राहणार आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही बैठक होणार आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह इतरही पक्षाचे नेते हजर राहणार आहेत. कालच काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी सरकारवर विविध प्रश्न उपस्थित करत टीका केली होती, भाजपने ही राहुल गांधींना प्रत्युत्तर दिले आहे. दोन्ही पक्षात आरोप-प्रत्यारोप सुरू असताना काँग्रेसच्या या बैठकीत भूमिकेकडे लक्ष लागले आहे.