भारत, रशियामध्ये आज महत्वाचे करार होण्याची शक्यता

0

नवी दिल्ली – रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन २ दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत. पुतिन यांचे काल भारतात आगमन झाले. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर त्यांनी पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली. आज भारत आणि रशियामध्ये महत्त्वाच्या करारावर स्वाक्षऱ्या होण्याची शक्यता आहे. आज पुतिन मोदींची भेट घेणार आहे.

दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंधांना अधिक मजबूत करणे. तसेच अमेरिकेने इराणवर कच्चे तेल आयात करण्यावर लावलेल्या प्रतिबंधावरही चर्चा होण्याची शक्यता आहे. महत्वाचे म्हणजे एस-४०० या रशियन क्षेपणास्त्र खरेदीवर सुद्धा मोठा करार होऊ शकतो. एस-४०० करार झाल्यास भारताच्या लष्करी सामर्थ्यात वाढ होईल. पाकिस्तान आणि चीनचा सामना करणे अधिक सोपे होईल. अमेरिकेच्या भौगोलिक स्थितीसारखी स्थिती भारताची नाही. मात्र, शेजारील देशांशी सामना करण्यासाठी या सुरक्षा प्रणालीचा उपयोग होणार आहे.