चाळीसगाव । रविवारी भारत वायर रोप कंपनी मधील कर्मचार्याने दिलेल्या तक्रारीची चौकशी करून गुन्हा करणार्या मूळ आरोपीचा पोलिसांनी शोध घ्यावा अशी मागणी संभाजी सेनेच्या वतीने करण्यात आली आहे. चौकशी न केल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
संभाजी सेनेच्या वतीने चाळीसगाव शहर पोलीस निरीक्षकांना गुरुवारी निवेदन देण्यात आले. खर्या गुन्हेगारांचा शोध घ्यावा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. निवेदनाच्या प्रति कामगार मंत्री कामगार आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, तहसीलदार यांना देण्यात आले असून निवेदनावर गिरीश पाटील, अविनाश काकडे, ज्ञानेश्वर पगारे, सुरेंद्र महाजन, विजय गबळी, विजय देशमुख, बंटी पाटील, ललित नवले, रवींद्र शिनकर, सुरेश तिरमली, सुरेश पाटील, प्रवीण पाटील यांच्या सह्या आहेत.