जळगाव । येथील भारत विकास परिषदेच्या अध्यक्षपदी प्रशांत महाजन यांची तर मानद सचिवपदी उज्ज्वल चौधरी यांची निवड झाली असून रविवार 15 रोजी सायंकाळी 6 वाजता आदर्श नगरातील लायन्स हॉल येथे होणार्या सोहळ्यात नविन पदाधिकारी दायित्व ग्रहण करणार आहेत. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी आ.सुरेश भोळे यांची तर प्रमुख वक्ते म्हणून चाळीसगांव येथील जीवसंरक्षक राजेश ठोंबरे यांची उपस्थिती लाभणार असल्याची माहिती अध्यक्ष तुषार तोतला व सचिव नंदकुमार जैस्वाल यांनी दिली.