भारनियमनामुळे केळीचे पिक सापडले धोक्यात

0

रावेर । तालुक्यात महावितरण कंपनीने सुरु केलेल्या झिरो लोडशेडींगमुळे केळी पाण्याअभावी धोक्यात आली आहे. केळीला वाचविण्यासाठी झिरो लोडशेडींग त्वरीत बंद करावी, अशी मागणी बाजार समितीच्या संचालक मंडळांनी महावितरणच्या अधिकार्‍यांकडे केली आहे.

रावेर तालुका केळी उत्पादक असून उन्हाळ्यात केळीला पाण्याची अधिक आवश्यकता असते. त्यासाठी ट्युबवेल, विहिरी दर पिकाला पाणी दिले जाते. मात्र भर उन्हाळ्यात महावितरण कंपनी वीज तासन्तास बंद करत आहे. त्यामुळे केळी पिक नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. पाण्याअभावी केळी पिकाचे झाडे खाली पडण्यास सुरुवात झाली आहे. उन्हामुळे केळी करपले आहे. केळी पिक वाचविण्यासाठी झिरो लोडशेडींग बंद करण्यासाठी शेतकर्‍यांना वीज पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी बाजार समितीच्या संचालक मंडळांनी आमदार हरिभाऊ जावळे व महावितरणच्या अधिकार्‍यांकडे दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.