भारिपचे तहसील कार्यालरासमोर घंटानाद आंदोलन

0

धुळे । भीमा-कोरेगांव येथे झालेल्या हल्ल्याचा मुख्य सुत्रधार मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे याला त्वरीत अटक करावी, भीमा-कोरेगांव हल्ला प्रकरणातील बहुजन बांधवांवरील सर्व गुन्हे मागे घ्यावे, यासह विविध मागण्यांसाठी भारिप बहुजन महासंघातर्फे तहसील कार्यालयसमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले. भारीपतर्फे त्यांच्या मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांना दिले.

यांची होती उपस्थिती
यावेळी जिल्हाध्यक्ष भैय्यासाहेब पारेराव, महानगरप्रमुख निलेश अहिरे, दिपक भामरे, योगेश जगताप, योगेश बेडसे, सागर मोहिते, मिलिंद वाघ, गौतम बोरसे, धाकला भाऊ निकम, भोला अहिरे, राहुल अहिरे, सनी जाधव, सोनु जमदाळे, समाधान देवरे, बंटी कांबळे, आकाश बागुल, इंद्रजीत कर्डक, वैभव मोरे, सुनील नागडे, राजु बिर्‍हाडे, नवीन देवरे, शिरपूर तालुका अध्यक्ष भुषण गवळे, शाखा प्रमुख आकाश बाविस्कर, वलवाडी शाखाप्रमुख संजय खोटे उपस्थित होते.

निवेदनातील मागण्या
ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी विद्यार्थ्यांना शंभर टक्के शिष्यवृत्ती एससी-एसटी विद्यार्थ्यांची थकित शिष्यवृत्ती तात्काळ अदा करावी, टीआयएसएस विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य करा,  शेतकऱ्याचा सातबारा कोरा करा, समाज कल्याणअंतर्गत येणारे भोजनाच्या निविदा प्रक्रियेमध्ये मागासवर्गीय व बेरोजगार महिला बचतगट, संस्था यांना प्रथम प्राधान्य, विशेष समाज कल्याणअंतर्गत असलेल्या सफाई कर्मचारी व शिपाई पदे तात्काळ भरावीत, राज्यातील सर्व महामंडळे यांना बँकेचा दर्जा देण्यात यावा, बेरोजगारांना विनातारण कर्ज, महिंदळे शिवारातील हॉटेल कृृष्णाईच्या बाजूला असलेल्या वसतीगृहाच्या जागेवर राज्य राखीव बल गट क्र. 6 ने बेकायदेशीर कब्जााविरोधात समादेशक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा.