भारिप बहुजन महासंघाचे विचार दुर्बल घटकांपर्यंत पोहोचून पक्ष बांधणी करा

0

विनोद सोनवणे : फैजपूर येथे पदाधिकार्‍यांची निवड

फैजपूर- भारिप बहुजन महासंघाचे विचार दुर्बल घटकांपर्यंत पोहचवून पक्ष बांधणीसाठी विविध जाती जमाती व बहुजनांचे, मुस्लिम , ओबीसी आदिवासींचे संघटन करून पक्ष बांधणी करा, असे आव्हान फैजपूर येथे पक्षाच्या पदाधिकारी निवड व प्रवेश कार्यक्रमाप्रसंगी पक्षाचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे यांनी केले. फैजपूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात कार्यकर्ता प्रवेश व पदाधिकारी निवडीचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी भारिप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे होते. यावेळी मारुळ, न्हावी, फैजपूर, वढोदा येथील कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केला. दरम्यान, यावेळी फैजपूरचे माजी नगरसेवक मनोज कापडे यांची भारिप बहुजन महासंघाचे यावल तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात येऊन जिल्हाध्यक्ष व उपस्थित पक्षाचे पदाधिकारी यांच्या हस्ते मनोज कापडे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.

यांची होती उपस्थिती
या प्रसंगी जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे, संगीता भामरे, मनोज कापडे आदींनी मनोगत व्यक्त करून कार्यकर्त्यांना पक्ष संघटन व बळकटीसाठी आव्हान केले. यावेळी भारिप बहुजन महासंघाचे युवा जिल्हा अध्यक्ष विजय पवार, जिल्हा उपाध्यक्ष दिनेश इखारे, जिल्हा सचिव संजय सुरडकर, युवा तालुकाध्यक्ष सचिन बार्‍हे, माजी तालुका अध्यक्ष दीपक मेघे, नीलिमा निकम, संगीता भामरे, देवदत्त मकासरे, निलेश जाधव, न्हास्वी ग्रामपंचायत सदस्य जावेद तडवी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.