भारिप बहुजन महासंघातर्फे भुसावळात निदर्शने

0
अत्याचाराच्या घटनांचा निषेध ; दोषींवर कारवाईची मागणी
भुसावळ :- तीन राज्यातील अत्याचाराच्या निषेधार्थ शहरात प्रांताधिकारी कार्यालयाबाहेर भारिप बहुजन महासंघातर्फे सोमवारी निदर्शने करण्यात आली. मागण्यांचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले. जम्मूतील कठुआ अत्याचार प्रकरण पूर्व नियोजीत होते. या घटनेत जम्मूतील भाजपा समर्थक वकील व हिंदू एकता मंच यांनी आरोपींची बाजू मांडली व गुन्हा दाखल करण्यास विरोध दर्शवला शिवाय या घटनेचा पंतप्रधान व आरएसएसने निषेध न केल्याने हिंसाचार घडवून आणणू हे घटनेचे प्रमुख कारण दिसून येते. या घटनेतील दोषींना फाशी द्यावी यासह अन्य मागण्यांसाठी निदर्शने करण्यात आली.
यांची होती उपस्थिती
भारिप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे, उपाध्यक्ष दिनेश इखारे, तालुकाध्यक्ष अ‍ॅड.मनोहर सपकाळे, सचिन वानखेडे, प्रा.दिलीप सुरवाडे, प्रमोद बावस्कर, बालाजी पठाडे, संदीप मोरे, संजय सुरळकर, अरुण तायडै, गणेश इंगळे, शांताराम नरवाडे, नंदा तायडे, किरण तायडे, नामदेव रोझोदकर, बबाबाई ठाकूर, विद्यानंद जोगदंड, योगेश तायडे, किशोर जोहरे, रमाकांत वाघ आदींची उपस्थिती होती.