भारिप वाहतूक शहराध्यक्षपदी विनोद पासुटेकर

0

पिंपरी : वाकड येथील सामाजिक कार्यकर्ते विनोद बाळकृष्ण पासुटेकर यांची भारिप बहुजन महासंघाच्या वाहतूक आघाडीचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्षपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली. विनोद पासूटेकर यांचा सामाजिक बांधिलकीचा उत्साह व पूर्वानुभव, तसेच जनसामान्यांशी असलेला संपर्क लक्षात घेत शहराध्यक्ष देवेंद्र तायडे यांनी त्यांना नियुक्तीपत्र प्रदान केले. यावेळी सरचिटणीस अखिल सय्यद, युवाध्यक्ष महादेव मगर, विनोद सरवदे, सामाजिक कार्यकर्ते संभाजी इजगज आदी उपस्थित होते.