भारीप बहुजन महासंघाला शहरात मिळतेय झळाळी

0

प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने यांच्या उपस्थितीत असंख्य कार्यकर्त्यांनी केला पक्षात प्रवेश

भुसावळ- शहरात भारीप बहुजन महासंघाचा जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळावा व प्रवेश सोहळा प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी असंख्य कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केल्याने शहरात भारीप बहुजन महासंघाला नवी झळाळी मिळत असल्याचे प्रतिपादन मान्यवरांनी व्यक्त केले. यामुळे कार्यकर्त्यांमध्येही उत्साह निर्माण झाला आहे.

महामानवाचे विचार सर्वांपर्यंत पोहोचवा -सोनोने
शहरातील संतोषी माता बहुउद्देशीय सभागृहात नुकताच भारीप बहुजन महासंघाचा कार्यकर्ता मेळावा व कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश सोहळा प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने यांच्या अध्यक्षतेखाली झाला. यावेळी भारीप बहुजन महासंघाला युवा नेतृत्वामुळे शहरात नवी झळाळी मिळत असून पक्षाच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान व विचार सर्व सामान्य नागरीकांपर्यंत पोहचवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने म्हणाले. मेळाव्याला जिल्हा निरीक्षक शरद वसतकार, धुळे जिल्हाध्यक्ष भैय्यासाहेब परेराव, जळगाव जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे, युवा जिल्हाध्यक्ष (बाळा) विजय पवार, सम्यक विद्यार्थी आंदोलनचे जिल्हाध्यक्ष योगेश जगताप, महिला प्रदेश उपाध्यक्षा सुजाता उमाळे यांची उपस्थिती होती.

यांनी केला प्रवेश
भारीप बहुजन महासंघाच्या या मेळाव्यात फैजपुरचे माजी नगरसेवक मनोज कापडे, नगरसेवक सैय्यद अस्लम बागवान (बोदवड), नगरसेवक गोकुळ कापडे, रूपेश भालेराव (चोपडा), नाना सोनवणे, इंद्रजित खेडकर यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. यासर्व प्रवेशकर्ते कार्यकर्त्यांचा प्रदेशाध्यक्ष व मान्यवरांनी सत्कार केला. सूत्रसंचलन सारीपुत्र गाढे तर आभार प्रवीण आखाडे यांनी मानले.

यांनीही केले मार्गदर्शन
जिल्हा निरीक्षक शरद वसतकार, योगेश जगताप, जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे यांनीही उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. मेळाव्याला जिल्हाभरातील मोठ्या संख्येने महिला पुरूष उपस्थित होते. मेळाव्यामुळे जिल्हाभरातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असल्याचे दिसून आले.

यांनी घेतले परीश्रम
मेळावा यशस्वीतेसाठी जिल्हा उपाध्यक्ष दिनेश इखारे, प्रवीण आखाडे, सचिव संजय सुरडकर, अ‍ॅड.मनोहर सपकाळे, गणेश इंगळे, युवा विद्यासागर खरात, निलीमा निकम, संगीता भामरे, रूपेश साळुंके, चेतन सुरवाडे, तुषार जाधव, बबन कांबळे, प्रमोद बाविस्कर, रीतेश नाईक, निलेश जाधव, दिनेश नरवाडे, संदीप निकम, किशोर सोनवणे, बबलू बिर्‍हाडे, संदीप मोरे, प्रशांत गोरदे, किरण वानखेडे, सोनू बनसोडे, सारीपुत्र गाढे, अरूण नरवाडे, किरण सांळुखे , संगम निकम, सचिन बार्‍हे आदींनी परीश्रम घेतले.