जकार्ता-भारताचा भालाफेकीपटू नीरज चोप्रा याने आशियाई क्रीडा स्पर्धांच्या नवव्या दिवशी भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले. निरजने आपल्या तिसऱ्या प्रयत्नात ८८.०६मीटरची सर्वोकृष्ट फेक केली. हि त्याची वैयक्तिक सर्वोकृष्ट कामगिरी ठरली. मात्र आशियाई क्रीडा स्पर्धांमधील विक्रम त्याला मोडता आला नाही. या स्पर्धेत ८९.१५ मीटरची सर्वात लांब फेक करण्यात आली होती.
याच स्पर्धेत त्याने पहिल्या प्रयत्नात ८३. ४६ मीटरची फेक केली होती. त्याच्या दुसरा प्रयत्न अपात्र ठरवण्यात आला. तर चौथ्या प्रयत्नात ८३. २५ मीटर फेक केली. यंदाच्या उदघाटन सोहळ्यात नीरजला भारतीय पथकाच्या ध्वजवाहकाचा मान मिळाला होता. ही निवड सार्थ ठरवत त्याने भारतासाठी सुवर्णपदक कमावले.