यावल : यावल तालुक्यातील भालोद येथील ललित जनार्दन परतणे (45, रा.चिखली दरवाजाजवळ, भालोद) यांनी आजाराला कंटाळून राहत्या घरातील वरच्या माजल्यावर दोरीने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना रविवार, 13 फेब्रुवारी रोजी सकाळी उघडकीला आले आहे. याबाबत फैजपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
आजाराला कंटाळून केली आत्महत्या
फैजपूर पोलिस ठाण्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, ललित परतणे हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून त्यांना दुर्धर आजार जडला होता. या आजारामुळे त्यांना शारीरिक त्रास होत होता. त्यामुळे रविवार 13 फेब्रुवारी रोजी ललित परतने यांनी राहत्या घरात असलेल्या पहिल्या मजल्यावर दोरीने छताच्या हुकाला बांधून गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे सकाळी उघडकीला आले. नातेवाईकांनी त्यांना खाली उतरून यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषित केले. याबाबत फैजपूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोलिस नाईक किरण चाटे करीत आहेत.