Molestation Of Minor Girl In Bhusawal : Youth Arrested भुसावळ : शहरातील एका भागातील 14 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून पीडीतेच्या भावालाही जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली. पीडीतेच्या तक्रारीवरून संशयीत आरोपी सचिन राजू मोरे (30) याच्याविरोधात शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली.
पाठलाग करीत विनयभंगाचा आरोप
शहरातील एका परीसरात 14 वर्षीय अल्पवयीन मुलगी 30 सप्टेंबर रोजी व 2 ऑक्टोबर रोजी शाळेच्या रस्त्याने जात असताना तसेच घराजवळ आल्यानंतर संशयीत आरोपी सचिन राजू मोरे (30) याने अल्पवयीन मुलीस वाईट उद्देशाने हातवारे केले तसेच पाठलाग करून विनयभंग केला तसेच पीडीत अल्पवयीन मुलीच्या भावास शिवीगाळ करीत जीवे ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी पीडीतेच्या तक्रारीवरून भुसावळ शहर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस उपनिरीक्षक दिलीप चौधरी हे करीत आहेत.