जळगाव : भारत विकास परिषदेतर्फे आयोजित प्रांतीय समुहगान स्पर्धेत भुसावळच्या सरदार वल्लभभाई पटेल गटाने प्रथम तर लातूरच्या राणी लक्ष्मीबाई गटाने व औरंगाबाद येथील स्वामी विवेकानंद गटाने अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांकाचे विजेतेपद मिळविले.
केमिस्ट भवन येथे आयोजित प्रांतीय समूहगान स्पर्धेचे पारितोषिक वितरण आ. सुरेश भोळे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर ‘योजक’ चे संचालक भगवतीप्रसाद मुंदडा, सुनिल भंगाळे, भाविपचे प्रांताध्यक्ष डॉ. नागेश नागपूरकर, उपाध्यक्ष अरुण जोशी, अध्यक्ष प्रशांत महाजन, सचिव उज्ज्वल चौधरी, दिनेश थोरात यांची प्रमुख उपस्थिती होती.
पहिल्या सत्रात महापौर सीमा भोळे यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या या स्पर्धेत देवगीरी प्रांतातील औरंगाबाद, जालना, लातूर, भुसावळ, चाळीसगांव व जळगाव येथील स्पर्धेेतील प्रथम क्रमांक विजेते सहा संघ सहभागी झाले होते. प्रत्येक संघाने हिंदी व संस्कृत भाषेत राष्ट्रभक्तीपर समुहगीते सादर केली. परिक्षण डॉ. नंदा इनामदार, राजेश पुराणिक, अलका चव्हाण यांनी केले.
याप्रसंगी आ.भोळे, भगवतीप्रसाद मुंदडा यांनी व परिक्षक म्हणून राजेश पुराणिक यांनी मनोगत व्यक्त केले. स्पर्धेचे संचालन प्रतिमा याज्ञिक यांनी तर सूत्रसंचालन अपूर्वा वाणी यांनी केले. आभार उज्ज्वल चौधरी यांनी मानले.
यशस्वीतेसाठी भारत विकास परिषदेचे तुषार तोतला, राजेश महाजन, प्रसन्न मांडे, रवींद्र लढ्ढा, योगेश मांडे, चेतन दहाड, राजीव नारखेडे, डॉ. सुरेश अग्रवाल, राजू कोचर, संजीव पाटील, दिपक शेठ, ज्योती लढ्ढा, गौरी तोतला, सीमा महाजन, उज्ज्वला मांडे, शैलेजा कोचर आदिंसह सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.