गायिका कल्याणी पांडे यांची गोदावरी संगीत महाविद्यालयास सदीच्छा भेट
जळगाव : भावी पिढीला संस्कारक्षम करण्यासाठी संगीत शिक्षण आवश्यक असल्याचे मत मुंबई येथील सुप्रसिध्द गायिका कल्याणी पांडे यांनी व्यक्त केले. मुंबई येथील सुप्रसिध्द गायिका कल्याणी पांडे यांनी गोदावरी संगीत महाविद्यालयास सदीच्छा भेट दिली. याप्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्या पद्मजा नेवे यांनी कल्याणी पांडे यांचे स्वागत केले. गायिका कल्याणी पांडे यांनी महाविद्यालयाविषयीची माहिती जाणून घेतली. यावेळी विद्यार्थ्यांनी काही गाणी देखिल सादर केली.
गाणी झाल्यानंतर गायिका कल्याणी पांडे यांनी गायनासाठी रियाज अत्यंत महत्वाचा असतो. रियाज नियमीतपणे झालाच पाहीजे. संगीत हे एक असे माध्यम आहे ज्यातुन गुरू आणि शिष्य यांच्यातील नात्याचे महत्व कळते. त्यामुळे चांगेल संस्कार देखिल घडतात. भावी पिढीला संस्कारक्षम करण्यासाठी संगीताचे शिक्षण आवश्यक असल्याचेही कल्याणी पांडे यांनी सांगितले. यावेळी त्यांच्यासोबत मंदार दिक्षीत , आशिष राणे, योगेश संदानशिव यांच्यासह महाविद्यालयातील शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.