पुणे । भावे हायस्कूलमध्ये दत्तक रस्ता स्वच्छता व जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. पंतप्रधान यांनी 2 ऑक्टोबर, 2019पर्यंत स्वच्छ भारत मोहिमेअंतर्गत ‘क्लीन इंडिया’ हे ध्येय ठरवले आहे त्या अनुषंगाने 1 ते 15 सप्टेंबर हा कालावधी ‘स्वच्छ भारत पंधरवडा’ साजरा करण्याबाबत केंद्र शासनाच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागाकडून निर्देश देण्यात आले. शाळेने 15 दिवसाच्ंया उपक्रमाचे नियोजन केले असून त्याअंतर्गत शनिवारी संस्था कार्यकारी अधिकारी सचिन आंबर्डेकर व सर्व पदाधिकारी उपक्रमात सहभागी झाले. माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यार्थी व शिक्षकांनी जनजागृती रॅली काढून शाळेसमोरील दत्तक रस्ता स्वच्छ केला. यावेळी विद्यार्थ्यांनी नागरिकांना सार्वजनिक स्वच्छतेविषयी माहिती देऊन शहर स्वच्छतेसाठी आवाहन करण्यात आले. स्वच्छता कमिटीच्या प्रमुख स्वाती गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना खराटे, हॅन्डग्लोज, डस्टबिन पेपर, साबण पुरविले. शाळेचे मुख्याध्यापक रोहिदास भारमळ, उपमुख्याध्यापिका कांता इष्टे, पर्यवेक्षिका भारती तांबे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.