बळसाणे । साक्री तालुक्यातील बळसाणे, दुसाणे, इंदवे, हाट्टी, ऐचाळे, म्हसाळे, लोणखेडी, घानेगाव, कढरे, सतमाने, छावडी, अमोदे, आगरपाडा, परसुळे, कर्ले, देवी व माळमाथा परिसर सांगितल्यावर कांदा उत्पादनाचे माहेर घर. माळमाथा परिसरात कांदा उत्पादनाच्या बाबतीत अव्वल क्रमांकावर असून वर्षाकाठी साधारणपणे 1800 ते 2000 ट्रक कांदा भरून या भागातून पाठविला जातो.
कांद्याला हमीभाव जाहीर करावा
वाढलेले भाव, मजूर दरवाढ अशा अनेक कारणांनी शेतकर्यांना मोठा खर्च येत असल्याने शेतकर्यांना सध्या 400 ते 500 रुपये क्विंटल भाव मिळत असल्याने खर्चच्या मानाने शेतकर्यांना कांदा पिक परवडत नसल्याचे शेतकर्याकडून सांगितले जाते आहे. शासनाने कांद्याला हमीभाव जाहीर करावा, अशी मागणी माळमाथा परिसरातील शेतकर्यांनी केली आहे. या परिसरात शेतकर्यांची अर्थिक घडामोडी कांदा या पिकावरच अवलंबून असल्याने शेतकर्यांची सर्वच आर्थिक गणित बिघडलेली आहेत. याकारणाने माळमाथाचा शेतकरी मोठ्या कौतुकाने म्हणतात ‘कांदास्नी यंदा भी करात वांदा, कसा काय लावो दर वरीसले कांदा’ अशी भावना शेतकर्यांच्या मुखातून उमटत आहे.
एकरी 35 ते 40 हजाराचा खर्च
यंदा सुरुवातीपासून पावसाने शेतकर्यांना चांगलेच अडचणीत आणले. पुर्ण पावसाळ्यात या परिसरात असा एकही जोरदार पाऊस झाला नाही. यामुळे नद्या, नाल्यांना पूर आला नाही व शेतातील वहिरींच्या जलपातळीत पाहिजे तशी वाढ झाली नाही. याकारणाने शेतकर्यांना जास्त प्रमाणात कांदा लागवड करता आला नाही. विहीरीत आहे तेवढ्या पाण्यावर शेतकर्यांनी कांदा लागवड केली. त्यातच पावसाने नुकसान केले. शेतकर्यांनी दिवस रात्र करून कांद्याला जगविले, परंतु कांद्याला हमीभाव मिळेल याची शाश्वती नाही. त्यामुळे कांदा खंडणी नंतर काय भाव मिळेल? याचा भरवसा नाही. कांद्याला एकरी खर्च पाहिला तर 35 ते 40 हजार रुपयापर्यंत शेतकर्यांना
येत असतो.