भाषातज्ज्ञ अरुण फडके यांचे निधन

0

नाशिक – शुद्धलेखनाचा केवळ आग्रह धरून चालणार नाही तर ती सवय झाली पाहिजे, असे सातत्याने सांगणारे आणि ‘शुद्धलेखन ठेवा खिशात’ या छोट्या पुस्तिकेद्वारे शुद्ध मराठी भाषा घराघरात पोहोचवणारे मराठी भाषातज्ज्ञ अरुण फडके (वय 65) यांचे नाशिक मुक्कामी निधन झाले.

अरुण फडके मागील चार वर्षांपासून नाशिक येथे वास्तव्यास होते. त्यांना कर्करोगाचे निदान झाले होते. या आजारपणातच आज सकाळी राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि सून आहे.