भिंतीवरून उडी मारत चोरट्यांनी 20 हजारांची भांडी भुसावळातून लांबवली

Thieves made away with pots worth 20,000 in Bhusawal भुसावळ : शहरातील खडका रोड, तळेले कॉलनी भागातील महिलेच्या घरातून चोरट्यांनी 20 हजार रुपये किंमतीची भांडी रविवारी मध्यरात्रीनंतर लांबवली. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात सोमवारी रात्री नऊ वाजता अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

भिंतीवरून उडी मारत केली चोरी
तक्रारदार मुताबजी निसार अहमद (50, खडका रोड, तळेले कॉलनी, भुसावळ) यांच्या घराच्या भिंतीवरून उडी मारून चोरट्यांनी चार लहान बादल्या, दोन तांब्यांचे हंडे, एक तांब्याचे ताट व चार तांब्याचे लोटे मिळून 20 हजारांची भांडी लांबवली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर मुताबजी अहमद यांनी बाजारपेठ पोलिसात सोमवारी रात्री अज्ञात चोरट्यांविरोधात तक्रार दाखल केली. तपास हवालदार सुनील जोशी करीत आहेत.