भिंत अंगावर कोसळून कामगार ठार

0

वाकड : भिंत पाडण्याचे काम सुरु असताना अंगावर भिंत कोसळून एक कामगार ठार झाला. अनारूल अल्लाउद्दिन एसके (वय 37, रा. गंगारामवाडी, हिंजवडी) असे त्ङ्माचे नाव आहे. याप्रकरणी इन्ङ्खोटेक रिसायकलिंग प्रा. लि. कंपनीचे लेबर ठेकेदार आणि ब्रेकर चालक यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनीचे मजुर ठेकेदार हिंजवडी येथील सिरनजी कंपनीच्या दुसर्‍या मजल्यावरील भिंती पाडण्याचे काम बुधवारी (दि. 4) पहाटे दोनच्या सुमारास कामगारांकडून करून घेत होते. हे काम सुरु असताना ठेकेदारांनी कामगारांच्या सुरक्षेसाठी कोणत्याही प्रकारची सुरक्षा साधने पुरविली नाहीत. कामाच्या ठिकाणी पुरेशी उजेडाची सोया केली नाही. तसेच काम चालू असलेल्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात राडा रोडा होता, तो साङ्ख केला नाही. ठेकेदारांनी आपल्या कामात हलगर्जीपणाची कसलीही कसर ठेवली नाही. ब्रेकरच्या साहाय्याने भिंत पाडताना भिंतीजवळ अनारुल हा कामगार काम करत होता. त्याच्या अंगावर भिंत कोसळली. यामध्ये त्याचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. हिंजवडीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ए. एम. पगारे तपास करीत आहेत.