सांगली : छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर राज्यकर्त्यांनी सातत्याने आपल्या सोयीस्कर राजकारणानुसार करून घेतला आहे. या लोकांना शिवरायांच्या विचारांशी, त्यांच्या कार्याशी काहीच देणे घेणे नाही.
प्रतापगडाच्या कुशीत शिवरायांचे स्मारक व्हावे यासाठी सध्या कुणीच प्रयत्न करताना दिसत नाही. त्यामुळे राज्यातील 288 आमदार हे जवळसपास बिनकामाचे आहेत, अशी टीका शिवप्रतिष्ठानचे संंभाजी भिडे यांनी केली आहे. तासगावात धारकर्यांची गडकोट मोहिमेसाठीच्या बैठकीत त्यांनी हे वक्तव्य केले. त्यावरून पुन्हा एकदा वाढ निर्माण होण्याची शक्यता आहे.