महापालिका आयुक्तांना दिले निवेदन
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात भिमसृष्टी उभारण्यात येत आहे. हे भिमसृष्टीचे काम अत्यंत संथ गतीने सुरु आहे. काही दिवसांवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती येते आहे. त्यामुळे या कामाचा वेग पहाता ही भिमसृष्टी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीपर्यंत पूर्ण होऊ शकत नाही. कामाची गती पाहता दिड महिन्यात हे काम पुर्ण होण्याची शक्यता धूसर आहे. त्यामुळे हे काम गतीने करुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जंयतीपर्यंत भिमसृष्टी पूर्ण करावी, अशी मागणी डॉ. बी. आर. आंबेडकर ग्रुपने महापालिकेकडे केली आहे. याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले आहे.
भिमसृष्टी मध्ये मुरल्स
भीमसृष्टीत म्युरल्स उभारण्यात येणार आहेत. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात माता रमाई यांचा पुतळा देखील उभारण्यात येणार आहे. तसेच या परिसराचे सुशोभिकरण करण्यात येणार आहे. हे काम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीपर्यंत पुर्ण झाले पाहिजे. कारण बाबासाहेबांच्या जयंतीला सर्वच लोकांची गर्दी असते. आलेल्या लोकांना अर्धवट भिमनगरी दाखविण्यापेक्षा पूर्ण करून लोकांना त्यावेळी पहायला मिळू दे, अशी मागणी डॉ. बी. आर. आंबेडकर ग्रुपचे सतिश कदम यांनी पालिकेकडे केली आहे.