ठाणे – भिवंडीमध्ये आगीच्या घटना नित्याचीच झाली आहे. या महिन्यात आगीच्या अनेख घटना भिवंडीत घडल्या. आज देखील सरवली एमआयडीसी परिसरातील उजागर डाईंगला भीषण आग लागली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या काही गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.
उजागर डाईंगला लागलेल्या भीषण आगीमध्ये १२ ते १३ डाईंग जाळून खाक झाले आहेत. भिवंडी, कल्याण, एमआयडीसी अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे.