भिवंडी । भिवंडी शहर परीसरातील नागरिकांना खड्डेमय रस्त्यांची मोठी डोकेदुखी झाली आहे. महापालिका प्रशासन रस्ता दुरूस्तीचे काम युद्धपातळीवर करीत नाही. महापालिका प्रशासन आणि नगरसेवक यांना जागे करून आर्थिक मदतीसाठी भिवंडीकर संघर्ष समितीच्या विद्यमाने सोमवारी शिवाजी चौक येथून भीक मांगो मोर्चा काढण्यात आला होता. मोर्चातील लोकांकडे तब्बल 33 डबे होते.
डब्ब्यात नागरीक यथाशक्ती अर्थ सहाय्यासाठी पैसे टाकीत होते. महापालिकेसमोर मोर्चा आल्यानंतर शिष्टमंडळाने अतिरिक्त आयुक्त अशोक रणखांब यांना निवेदन दिले. मात्र यावेळी अर्थसहाय्याचे डबे स्विकारले नाही. तद्नंतर प्रांताधिकारी यांना निवेदन आणि डब्बे सुपूर्त करण्यात आले. महापालिका प्रशासन रस्ता दुरूस्तीचे काम युद्धपातळीवर करीत नाही. महापालिका प्रशासन आणि नगरसेवक यांना जागे करून आर्थिक मदतीसाठी भिवंडीकर संघर्ष समितीच्या विद्यमाने सोमवारी शिवाजी चौक येथून हा मोर्चा निघाला होता. मोर्चात समिती अध्यक्ष सुहास बोंडे, मोहन वल्लाळ, धनपाल देशमुख, आर.एल.मिश्रा, संजय चव्हाण आणि स्थानिक रहिवाशी सहभागी झाले होते.