भिवंडीत भीषण आग; ११ गोदामे जळून खाक

0

ठाणे: भिवंडीतील भीषण आगीत प्लास्टिकचे गिफ्ट्स आणि खेळण्यांच्या ११ गोदामे जळून खाक झाली आहे. अग्निशमन दलाचे जवान सध्या घटनास्थळी दाखल झाले आहेत. ही आग विझवण्यासाठी ३ ते ४ तास लागण्याची शक्यता आहे. या आगीमुळे गुंदवली ग्रामपंचायत हद्दीत धुराचे लोट पसरले आहेत. गुंदवलीतील श्रीकृष्ण कॉम्प्लेक्समध्ये ही आग लागली आहे.

भिवंडीतील आग विझवण्यासाठी सध्या अग्निशमन दलाच्या ५ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग नियंत्रणात आणण्यासाठी सध्या अग्निशमन दलाच्या जवानांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. भिवंडीतील गुंदवली भागात प्लास्टिक वस्तू, खेळण्यांची गोदामं आहेत. या गोदामांना आगीचा मोठा फटका बसला आहे. कांदिवलीतील दामूनगर भागातही आग लागली आहे. या ठिकाणी अग्निशमन दलाच्या चार गाड्या दाखल झाल्या आहेत.

मुंबईतील आगीच्या घटना रोजच्याच झाल्या आहेत.