भिवंडी निजामपूर महानगरपालिकेतील रस्ता दुरुस्तीसंदर्भात दोषींविरुद्ध कारवाई

0

नागपूर : भिवंडी निजामपूर महानगरपालिकेतील आर्थिक नुकसानीबाबत आय.आय.टी. मुंबई यांच्याकडून मानकांनुसार कमी केलेल्या कामाच्या रकमेची परिगणना करुन त्यानुषंगाने संबंधित ठेकेदाराविरुद्ध नोटीस बजावून रक्कम वसूल करण्याची कार्यवाही भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका स्तरावर सुरु आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली. भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेने रस्त्यांच्या गुणवत्तेविषयक प्राप्त तक्रारीनुसार शहानिशा करण्यासाठी आयआयटी मुंबई यांची नियुक्ती केली. आयआयटीच्या अहवालानुसार महानगरपालिकेने उपरोक्त रस्त्याच्या कामाशी संबंधित चार कनिष्ठ अभियंता, एक उप अभियंता यांना निलंबित केले असून त्यांच्याविरुद्ध विभागीय चौकशी सुरु आहे, असेही श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.