मंचर । भीमाशंकर देवस्थानाच्या विकासासंदर्भात आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याची ग्वाही संघाचे सरकार्यवाहक भय्याजी जोशी यांनी दिली. येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केलेल्या महायज्ञ कार्यक्रमासाठी संघाचे सरकार्यवाहक भय्याजी जोशी आले होते. त्यांनी भीमाशंकरच्या पवित्र शिवलिंगाचे दर्शन घेतले व महायज्ञाच्या पूर्णाहुती कार्यक्रमात सहभाग घेतला.
4 डिसेंबरपासून भीमाशंकर जवळील हॉटेल नटराज येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा महायज्ञाचा कार्यक्रम सुरू होता. संघाने राष्ट्र कल्याणासाठी देशातील प्रत्येक बारा ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी असा कार्यक्रम घेतला. या कार्यक्रमासाठी देश व राज्यातील अनेक मान्यवर येणार असल्याची चर्चा होती. मात्र, गुरुवारी (21 डिसेंबरला) महायज्ञाच्या पूर्णाहुती समारंभास सुरेश सदाशिव तथा भय्याजी जोशी यांनी हजेरी लावली. यावेळी देवस्थानचे उपकार्यकारी विश्वस्त अॅड. सुरेश कौदरे, विश्वस्त मधुकर गवांदे, दत्तात्रय कौदरे, चंद्रकांत कौदरे यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी देवस्थानच्या प्रमुख पदाधिकार्यांनी त्यांच्याबरोबर चर्चा केली. देवस्थान विकासासंदर्भात चर्चा झाली. यावेळी विकासाच्या कामात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ लागेल ते सहकार्य करेल, असे आश्वासन भय्याजी जोशी यांनी दिले.