तालुका बहुजन क्रांती समितीकडून आयोजन ; तहसील प्रशासनाला निवेदन
यावल :- भीमा-कोरेगाव हल्ल्याच्या निषेधार्थ सोमवारी तालुका बहुजन क्रांती समितीकडून मोर्चा काढण्यात आला. विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. मंगळवारी सकाळी 11 वाजता मोर्चेकरी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात एकत्र झाले व तेथून तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. भीमा-कोरेगाव हल्ल्याच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या.
मिलिंद एकबोटेंना अटक का नाही ?
1 जानेवारी रोजी व्दिशताब्दी वर्षानिमित्त भीमा-कोरेगाव रणसंग्रामातील शहिदांना सलामी देण्याकरीता जमलेल्या मुलनिवासी बहुजन समाजातील लोकांवर भ्याड हल्ला झाला. त्याचा निषेध नोंदवत मिलींद एकबोटे, मनोहर उर्फ संभाजी भिडे व आनंद दवे यांच्यावर अनुसूचित जाती व जनजाती अत्याचार निर्मुलन कायद्यान्वये गुन्हे दाखल आहेत मात्र त्यांना अटक झाली नाही तेव्हा त्यांना अटक व्हावी शांततापूर्वक संविधानिक पध्दतीने निषेधार्थ बंद पाळणार्या लोंकावर खोटे गुन्हे दाखल करीत कोंम्बिंग ऑपरेशनव्दारे निरापराध तरूणांना अटक करणे, बौध्द व मराठा समाजात विविध माध्यमातून विवाद उभे करणे, दंगलखोरांना संरक्षण देणे अशा राज्य सरकार व पोलिस प्रशाच्या चुकीच्या धोरणांचा निषेध करण्यात आला. निवेदनावर मोर्चाचे अध्यक्ष कुंदन तायडे, अजय इंगळे, समाधान इंगळे, विकास तायडे, पंकज तायडे, प्रदिप इंदवेे, सागर अट्रावलकर, प्रतीक पारधे, प्रकाश पारधे, सागर गजरे, राजु सुरवाडे, संतोष डांबरे, ज्ञानदेव भालेराव, निलेश सपकाळे, विशाल गजरेे, सिध्दार्थ तायडे, आकाश तायडे आदींच्या स्वाक्षर्या आहेत. तहसील कार्यालयात निवासी नायब तहसीलदार वैभव पवार यांनी निवेदन स्वीकारले. प्रसंगी पोलीस निरीक्षक डी.के.परदेशी उपस्थित होते.