भीमा-गोरेगाव घटनेचे बर्‍हाणपूरात पडसाद, 15 बसेसच्या काचा फोडल्या

0

शहर कडकडीत बंद; पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

रावेर: भीमा-गोरेगाव घटनेचे बर्‍हाणपूरातही गुरुवारी पडसाद उमटले. संतप्त जमावाने मध्यप्रदेश परीवहन निगमच्या 15 बसेसवर दगडफेक केल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले. अचानक घडलेल्या या प्रकारानंतर प्रवाशांची पळापळ झाली. शहर बंदच्या हाकेला व्यापार्‍यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने शहर कडकडीत बंद असून जागोजागी पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे. बर्‍हाणपूर येथून महाराष्ट्रात येणार्‍या बसेसही थांबल्याने प्रवाशांचे मोठे हाल झाले. काँग्रेसने रॅलीने काढून प्रांताधिकारी यांना निवेदन दिले.