भीम अ‍ॅपद्वारेदेखील मिळतेय प्रवाशांना रेल्वे प्रवासाचे तिकीट

0

भुसावळ– कॅशलेस व्यवहारांना चालना देण्यासाठी भुसावळ विभागात आरक्षित तथा अनारक्षित तिकीट काढण्यासाठी डेबिट-क्रेडिट कार्डासह भीम अ‍ॅप उपलब्ध करून देण्यात आले आहे. पार्किंग, केटरींग स्टॉल, शौचालय आदी ठिकाणी पे-टीएम तसेच भीम अ‍ॅपद्वारा रक्कम भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. भुसावळ विभागातील 61 रेल्वे स्थानकांवर पीओएस मशीन उपलब्ध आहे. सर्व रेल्वे स्थानकांवर भीम अ‍ॅपची सुविधा उपलब्ध असल्याचे डीआरएम आर.के.यादव यांनी कळवले आहे.