अमरावती : भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांना सभा घेण्यासाठी राज्यात पहिल्यांदाच परवानगी मिळाली आहे. अमरावती येथे चंद्रशेखर आझाद यांच्या सभेला पोलिासंनी परवानगी दिली आहे. आतापर्यंत चंद्रशेखर आझाद यांच्या मुंबईतील आणि पुण्यातील सभेला पोलिसांनी परवानगी दिली नव्हती. मात्र आता अमरावतीमध्ये पोलिसांनी त्यांच्या सभेला परवानगी दिल्यामुळे उद्या दुपारी दोन वाजता आझाद यांची अमरावतीमध्ये सभा होणार आहे. अमरावती येथील सायन्स कोअर मैदानावर चंद्रशेखर आझाद यांची जाहीर सभा होणार आहे.