Cargo vehicle collides with two-wheeler : Child Dies In Jalgaon जळगाव : जळगाव-शिरसोली रस्त्यावरील एलएच पेट्रोल पंपासमोर जळगावकडे निघालेल्या दुचाकी स्वराला मागून मालवाहू वाहनाने जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील दीड वर्षीय बालकाचा मृत्यू ओढवला तर दुचाकीस्वार जखमी झाला. हा अपघात रविवार, 11 डिसेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता सुमारास घडला. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर नातेवाईक व मित्र परीवाराने जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात मोठी गर्दी केली. शेख अली शेख शरीफ (1.5, फातिमानगर, जळगाव) असे मृत झालेल्या बालकाचे नाव आहे तर शेख अमिन शेख आरीफ असे जखमी दुचाकीस्वाराचे नाव आहे. हे जखमी झाले आहे.
जागीच बालकाचा मृत्यू
शेख अमीन शेख आरीफ यांना पंधरा दिवसांपूर्वीच मुलगी झाली होती. त्यामुळे मुलीला पाहण्यासाठी रविवार, 11 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता सासरवाडी शिरसोली येथे त्यांचा भावाचा मुलगा शेख अली शेख शरीफ याला सोबत घेऊन गेले. मुलीला बघितल्यानंतर पुन्हा दुचाकीने जळगावकडे येत असताना सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास जळगाव शिरसोली रस्त्यावरील एल.एस.पेट्रोल पंपाजवळून जात असताना मागून भारधाव वेगाने येणार्या मालवाहू छोटाहत्ती क्रमांक (एम.एच.19 सी.वाय.3290) ने जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील दीड वर्षाचा चिमुकला शेख अली हा रोडवर पडल्याने डोक्याला गंभीर दुखापत झाली, यात त्याचा जागीच मृत्यू झाला तर शेख अमीन हे गंभीर जखमी झाले.
एमआयडीसी पोलिसात नोंद
अपघात घडल्यानंतर नातेवाईकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन बालकाचा मृत्यू जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना करण्यात आला. यावेळी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांची प्रचंड गर्दी केली होती. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.