खालापूर : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर पुण्याकडे येणार्या इनोव्हा कारच्या चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात झाला. रायगड जिल्ह्यातील खालापूर टोल नाक्याजवळ झालेल्या या अपघातात तीनजणांचा मृत्यू झाला. तर तीनजण गंभीर जखमी झाले. बुधवारी सकाळी नऊच्या सुमारास धामनी गावाजवळ ही घटना घडली. इनोव्हा चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी पुणे लेनवर आली. त्याचवेळी पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणर्या मारूती रिट्स कारला इनोव्हाची धडक बसली. अपघातामुळे काही वेळाकरता वाहतूक विस्कळीत झाली होती. महामार्ग पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला काढून वाहतूक सुरळीत केली.