भीषण आगीत लाकडी गोदाम खाक

0

चिखली : येथे रविवारी पहाटे पावणेपाचच्या सुमारास भीषण आग लागून संपूर्ण लाकडी गोदाम खाक झाले. एम. के. ट्रेडर्स असे गोदामाचे नाव आहे. गोदाम लाकडाचे असल्याने लवकरच पेट घेत मोठ्या प्रमाणात आग भडकली. स्थानिकांनी पाहिल्यानंतर याची अग्निशामक दलाला माहिती दिली. पिंपरीचे तीन तर भोसरी, तळवडे आणि प्राधिकरणचे एक अशा सहा बंब वापरून आग आटोक्यात आणण्यात आली. मात्र, तोपर्यंत संपूर्ण गोदाम जळून खाक झाले. आगीचे नेमके कारण समजलेले नाही.