भीषण दुष्काळ पाहता केंद्राने राज्याला मदत द्यावी; सुप्रिया सुळेंची लोकसभेत मागणी

0

नवी दिल्ली: महाराष्ट्रातील दुष्काळ आणि पाण्याच्या गंभीर समस्येबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी संसदेत मुद्दा उपस्थित केला. 2018 मध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला, यंदाही 2019 मध्ये मान्सुन येण्यास विलंब झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. धरणांमधील पाणीसाठा कमी झाल्याने शेतीसाठी आणि पिण्यासाठीही पाणी मिळत नसल्याचे चित्र आहे.

महाराष्ट्रातील पाण्याच्या समस्येचा शेती उत्पादनावर परिणाण होऊन आगामी 2019/20 या वर्षात 40 टक्के उत्पादन कमी होण्याची शक्यता असल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटले. तसेच, यामुळे जनावरांना चाराही मिळणार उपलब्ध होणार नाही. त्यामुळे केंद्र सरकारने महाराष्ट्रातील दुष्काळ परिस्थिती लक्षात घेऊन राज्याला मदतनिधी उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणीहीही सुळे यांनी केली. तसेच, पाण्याच्या समस्येमुळे दिवसाला 8 शेतकरी आत्महत्या करत असल्याचा अहवाल आहे, अशी माहितीही सुळे यांनी संसदेत प्रश्न उपस्थित करताना दिली.