पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते भुजबळ यांना मनुवादी समर्थकांकडून मनुस्मृती ला विरोध थांबवा अन्रथा तुमचा दाभोलकर, पानसरे करू, अशी धमकी देण्यात आली. याचा निषेध करण्यासाठी सोमवारी विविध संघटनांच्यावतीने डॉ .बाबासाहेब आंबेडकर पुतळ्राजवळ तीव्र निदर्शने करुन निषेध व्रक्त करण्यात आला. या आंदोलनात ओबीसी संघर्ष समितीचे अध्रक्ष आनंदा कुदळे, सुरेश गारकवाड, विश्वास राऊत, चंद्रकांत डोके, नंदा करे, स्वराज अभिरानचे प्रदेशाध्रक्ष मानव कांबळे, नागरी हक्क सुरक्षा समितीचे प्रदीप पवार, नीरज कडू, दिलीप काकडे, बारा बलुतेदार संघटनेचे प्रताप गुरव, मार्क्सवादी कम्रुनिस्ट पक्षाचे गणेश दराडे, अपर्णा दराडे, डीवारएफआरचे सचिन देसाई, शेकापचे शहराध्रक्ष नितीन बनसोडे, नाना फुगे, बहुजन हितार ग्रँथालराचे गिरीश वाघमारे आदी विविध सामाजिक संघटनाचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.
यावेळी आंदोलकांसमोर बोलताना स्वराज अभिरानचे प्रदेशाध्रक्ष मानव कांबळे म्हणाले की, आपला लढा अपप्रवृत्ती विरोधात आहे .पुरोगाम्रांना जीवे मारण्याचा धमक्या दिल्या जात आहेत .हिंदुत्ववादी, सनातनी मंडळी याचे समर्थन करत आहेत यामुळे धर्मनिरपेक्षतेला धोका निर्माण झाला आहे याविरोधात पुरोगामी विचारांच्या संघटनांनी लढा उभारावा .प्रतिगामी विचारांचे सरकार उलथवून टाकावे असे आवाहन यांनी केले.