भुजबळ यांना शिवीगाळ करणारा पोलीस अधिकारी निलंबित

0

नागपूर-पोलीस उपनिरीक्षक महावीर जाधव यांनी माजी उपमुख्यमंत्री आमदार छगन भुजबळ यांना शिवीगाळ केली, त्याची ऑडीओ क्लिप व्हायरल झाली होती. या पोलीस अधिकाऱ्याविरोधात आज विधानसभेत हक्कभंग प्रस्ताव दाखल करण्यात आला. त्यामुळे महावीर जाधव यांचे निलंबन करण्यात आले आहे. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभेत हक्कभंग प्रस्ताव मांडत पोलीस अधिकारी महावीर जाधव यांच्या निलंबनाची मागणी केली.

आमदारांशी अधिकारी उर्मट वागतात असा प्रश्न उपस्थित करत विधानसभेत गोंधळ झाला. त्यामुळे सभागृहाचे कामकाज काही काळासाठी तहकूब करण्यात आले. माजीमंत्री एकनाथ खडसे यांनी देखील या प्रस्तावाला अनुमोदन देत अधिकाऱ्यांबद्दल नाराजी व्यक्त केली. आमदारांना मिळणाऱ्या  वागणुकीवरून हक्कभांगाच्या प्रस्तावाला  सर्व पक्षीय सदस्यांनी अनुमोदन दिले.