अमळनेर । अमळनेरची आरोग्य वाहिनी ठरणारी 67 कोटींची भुयारी गटार योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे वर्ग करून न.पा. अमळनेरच्या सत्ताधारी भ्रष्टचार्यांना शासनाने धडा शिकविला अशी प्रतिक्रिया सर्वत्र व्यक्त होत आहे. 15 ते 20 वर्षापासून रखडलेली भुयारी गटार योजना आमदार शिरीष चौधरी यांनी मंजूर करून आणली. सर्व्हेचे काम करणारे श्री दहाशस्त्रे यांच्याकडून भुयारी गटार प्रकल्पाचा डिजिटलसर्व्हे करून स्कीम तयार केली. मक्तेदारास कामाची मंजूरी दिल्यानंतर या योजनेचा पहिला हफ्ताही प्राप्त झाला. नंतर अमळनेर पालिकेत सत्तांतर झाले तरी डॉ. रविंद्र चौधरी व आमदार शिरीष चौधरी यांनी शहराच्या विकास कामांना सहकार्य केले. सदर भुयार गटार प्रकल्पासाठी तांत्रिक सल्लागार न नेमता व शासनाच्या कोणत्याही कार्यालयाची तांत्रिक मार्गदर्शन न घेता सुमारे 30 ते 40 टक्के कमिशन घेवून 2.25 कोटी रुपये नियमबाह्य पद्धतीने मक्तेदाराला दिले असल्याचे सर्वत्र बोलले जात आहे.
भुयारी गटारीचे कामे वर्ग केल्याने सत्ताधार्यांचे धाबे दणाणले
आमदार चौधरींनी ही बाब महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाला लक्षात आणून दिले, शासनाने या गोष्टीची गंभीर दखल घेवून चौकशी केली. 5 मे 2017 रोजी नगरविकास विभागाचे सहसचिव यांच्या सहीने महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मुंबई व मुख्याधिकारी नगरपालिका अमळनेर यांना पत्र पाठविले. निधीसह भुयारी गटार प्रकल्प महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे निधी सह सोपवावा, असे स्पष्ट म्हटल्यामुळे नगरपालिका अमळनेरच्या सत्ताधार्यांचे धाबे दणाणले असुन शासन त्यांची विश्वाससाहर्ता संपली आहे. नगरपालिकेत अमळनेर बिनचूक व गुणवत्तापूर्ण काम करू शकत नाही, यावर शासनाने शिक्कामोर्तब केला अशी सर्वत्र चर्चा आहे. 10 वर्षापूर्वी अविनाश पाटील यांना कंपनीमार्फत सर्व्हेचे काम देण्यात आले होते. परंतु सर्व्हेअरचे न करता मार्च 2017 मध्ये त्यांना नगरपालिकाकडून 48 लाख अदा केले आहे. तांत्रिक मार्गदर्शन न घेता बिल अदा करण्याचे पाप करून भूषण मिरवीत आहेत. न.पा. अमळनेर भ्रष्टाचाराचे कुरण आहे हे शासनाच्या वेळीच लक्षात आल्याने पुढील अनर्थ टळल्यामुळे आमदार शिरीषदादा चौधरींचे असून अमळनेरच्या जनतेच्या वतीने व आमदार शिरीषदादा चौधरी मित्र परिवार आघाडीच्या वतीने त्यांचे अभिनंदन केले आहे.
चौधरी गटाकडून आनंदोत्सव
यावेळी अमळनेर विश्रामगुहासमोर एकत्र येवून फटाके फोडून आनंद व्यक्त केला. याप्रसंगी श्रीराम चौधरी, प्रा.अशोक पवार, उदय पाटील, अनिल महाजन, नरेंद्र चौधरी, भाऊसाहेब महाजन, सुरेश सोनवणे, सलीम टोपी, नितेश लोहरे, पंकज चौधरी, किरण बागुल,सुनील भामरे, किरण सावंत, शंशाक संदानशिव, प्रज्ञशील सैदाने, विजेंद्र शिरसाळे, मंजित सोनार, दिनेश पाटील, गोकुळ पाटील, पंकज शेटे, दीपक चौगुले आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.