नंदुरबार । बालेवाडी (पुणे) येथे झालेल्या राज्यस्तरीय सिनिअर गट पुरुष/महिला अजिंक्यपद स्पर्धेत नंदुरबार जिल्हा ऍथलेटिक्स असोसिएशनचा खेळाडू पो.कॉ.भुषण चित्ते यास कांस्य पदक मिळाले आहे. महाराष्ट्र ऍथलेटिक्स असोसिएशनच्या मान्यतेने व पुणे जिल्हा ऍथलेटिक्स असोसिएशनच्यावतीने दि.23 ते 26 जून दरम्यान राज्यस्तरीय सिनिअर गट पुरुष/महिला अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन बालेवाडी (पुणे) येथे करण्यात आले होते. सदर स्पर्धेत नंदुरबार जिल्हा ऍथलेटिक्स असोसिएशनचा खेळाडू पो.कॉ.भुषण चित्ते याने हातोडा फेक क्रीडा प्रकारात सहभागी होवून 42.79 मीटर उच्चांक नोंदवून महाराष्ट्रात तृतीय आला. त्याच्या या यशाबद्दल आ.चंद्रकांत रघुवंशी, पोलीस अधीक्षक राजेंद्र डहाळे, प्रा.दिलीप जानराव, घनश्यामा राठोड, प्रा.मयुर ठाकरे आदींनी अभिनंदन केले.