भुसावळकरांचे आरोग्य गढूळ पाण्याने धोक्यात

0

दोन दिवसात समस्या सुटणार : मुख्याधिकारी करुणा डहाळे

भुसावळ : शहरात पालिकेतर्फे गढूळ पाणीपुरवठा झाल्याने नागरीकांचे आारोग्य धोक्यात आल्याची भीती व्यक्त होत आहे. तापीच्या बंधार्‍यात साठा अल्प असल्याने व त्यातच शेवाळ जमल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे शिवाय पालिकेकडे असलेले क्लोरीनही संपल्याने नागरीकांना मोठा मनस्ताप सोसावा लागत आहे. या पार्श्‍वभूमीवर मुख्याधिकार्‍यांनी रेल्वे प्रशासनाकडून तसेच जळगाव येथून तातडीने क्लोरीन सिलिंडर बोलावले असून दोन दिवसात ही समस्या सुटणार असल्याचे त्या म्हणाल्या.

सोशल मिडीयावर पालिकेवर टिका
पालिकेतर्फे शहरवासीयांना होणारा पाणीपुरवठा हा गढूळ होत असून पाण्याचा वास देखील होत असल्याने सोशल मिडीयावर पालिकेची खिल्ली उडवली जात आहे शिवाय भुसावळकरांना आता थेट नळाद्वारे पाणीपुरीचे पाणी मिळत असल्याच्या पोस्टही व्हायरल्या झाल्या आहेत त्यामुळे पालिका प्रशासनाने नागरीकांच्या आरोग्याशी चालवलेला खेळदेखील थांबवण्याची अपेक्षा आहे.

दोन दिवसा समस्या सुटणार -मुख्याधिकारी
तापीच्या बंधार्‍यात अल्प साठा असून आवर्तन सोडण्याची मागणी प्रशासनाकडे करण्यात आली आहे शिवाय रेल्वे प्रशासनाकडूून तसेच जळगाव येथून क्लोरीन सिलिंडर मागवण्यात आले असून येत्या दोन दिवसात समस्या सुटणार असल्याचे मुख्याधिकारी करुणा डहाळे म्हणाल्या.

आठवडाभरात पुरेल इतकाच साठा
तापीच्या बंधार्‍यात आठवडाभर पुरेल इतकाच पाणीसाठा असल्याने प्रशासनाने तातडीने आवर्तन सोडण्याची अपेक्षा आहे. शिवाय पालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रात क्लोरीन साठा संपल्याची माहिती असून पालिका प्रशासनाने तातडीने याबाबत उपाययोजना करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.