भुसावळकरांना दिलासा : खड्डेमय रस्त्यांना डांबरी पॅचवर्क
जामनेर रोडपासून केली डागडूजीला सुरवात : भुसावळातील 12 कोटींच्या कामांनाही मिळावी चालना
भुसावळ : खड्ड्यांमुळे त्रस्त झालेल्या भुसावळकरांना मोठा दिलासा मिळाला असून शहरातील खड्डेमय झालेल्या जामनेर रोडपासून डांबरीकरणाच्या पॅचवर्कच्या कामाला सोमवारपासून सुरूवात झाली आहे. नगराध्यक्ष रमण भोळे, उपनगराध्यक्षा सोनी बारसे, मुख्याधिकारी संदीप चिद्रवार, माजी प्रभारी नगराध्यक्ष प्रमोद नेमाडे, माजी नगरसेवक संतोष बारसे आदींसह सत्ताधारी गटाचे नगरसेवक यावेळी उपस्थित होते. पालिकेने किमान खड्ड्यांची डागडूजी करण्याचे काम सुरू केल्याने वाहनधारकांना दिलासा मिळाला आहे.
12 कोटींच्या निधीतील कामे मात्र रखडली
शहरातील 12 कोटींच्या निधीतून होणार्या रस्त्यांची कामे रखडली आहेत. दुसरीकडे पालिकेने पावसाळ्यात काही रस्त्यांवर टाकलेला मुरुमाचा लेपही वाहून निघाला आहे. यामुळे वाहनधारकांना खड्ड्यांचा त्रास सहन करावा लागत होता. शहरातील रस्त्यांबाबत सातत्याने वाहनधारकांमधून ओरड होत
प्रश्न उपस्थित करुन प्रशासनाचे लक्ष वेधल आहे. अखेर पालिका सत्ताधार्यांनी सोमवारपासून शहरातील प्रमुख मार्गांवर डांबरीकरण पॅचवर्कचे काम हाती घेतले आहे. या कामाचा शुभारंभ सोमवारी नगराध्यक्ष रमण भोळे यांनी केला.
सर्वच रस्त्यांवर पॅचवर्कचे काम होणार
शहरातील प्रमुख सर्व रस्त्यांवर पॅचवर्क केले जाणार आहे तसेच आगामी काळात 12 कोटींच्या रखडलेल्या रस्त्यांच्या कामांनाही गती दिली जाणार आहे. यावेळी नगरसेवक अमोल इंगळे, माजी नगरसेवक राजेंद्र आवटे, किशोर पाटील, देवेंद्र वाणी, रीपाईंचे रमेश मकासरे, माजी नगरसेवक संतोष बारसे आदींसह नगरपालिकेचे पदाधिकारी उपस्थित होते. पालिकेने उशिराने का होईना हे काम हाती घेतल्याने वाहनधारकांना दिलासा मिळाला आहे. मात्र आता किमान हे काम जलदगतीने व्हावे, 12 कोटींच्या निधीतील रस्त्यांनाही गती द्यावी, अशी अपेक्षा वाहनधारकांनी व्यक्त केली आहे.
आमदारांनी मानले आभार
जामनेररोडवर खड्ड्यांचे पॅचवर्कचे काम सुरू असतानाच या मार्गाने आमदार संजय सावकारे जात होते. त्यांना काही नगरसेवकांनी थांबवले. या कामाची त्यांनी माहिती घेवून पालिका प्रशासनाचे आभार मानले. शहरातील रस्त्यांचा प्रश्न बिकट झाला असून उशिराने का होईना काम केले जात असल्याने नागरीक व वाहनधारकांना दिलासा मिळेल, असे त्यांनी यावेळी सांगून एकेकाळी भाजपमध्ये व आता माजी मंत्री खडसेंसोबत राष्ट्रवादीत गेलेल्या उपस्थित गटाचे आभार मानले.