भुसावळ- पालिकेकडे अवघे तीन टँकर असल्याने उन्हाळ्यात बंधार्यातील साठा कमी झाल्यानंतर नागरीकांची पाण्यासाठी भटकंती होत होती. नगराध्यक्ष रमण भोळे यांनी पालिकेच्या बैठकीत टँकर खरेदीचा प्रस्ताव मांडून तो मंजूर करून घेतल्यानंतर तीन टँकरची खरेदी करण्यात आली तर एका जुन्या टँकरची डागडूजी पूर्ण करण्यात आली. सोमवारी सकाळी पालिकेच्या जलशुध्दीकरण केंद्रात या टँकरचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी आमदार संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे आदींसह पालिकेचे सर्व सभापती, नगरसेवक उपस्थित होते.
उन्हाळ्यात नागरीकांना टँकरचा दिलासा
सध्या शहराला आठ दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे तर एकूण 47 प्रभागात पाणीपुरवठा करणे जिकिरीचे ठरत आहे मात्र नव्याने खरेदी करण्यात आलेल्या टँकरमुळे शहरवासीयांना काहीसा दिलासा मिळाला आहे. पाणीपुरवठ्याच्या टँकरवरून गत पालिकेच्या सभेत वादळी चर्चा झाल्यानंतर सत्ताधार्यांना विरोधकांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते तर आता पालिकेकडे एकूण सात टँकर झाल्याने नागरीकांची गैरसोय काही प्रमाणात निश्चितच दूर होईल, असे नगराध्यक्ष भोळे म्हणाले.
यांची होती उपस्थिती
टँकरच्या लोकार्पणप्रसंगी मुख्याधिकारी बी.टी.बाविस्कर, माजी उपनगराध्यक्ष युवराज लोणारी, पाणीपुरवठा सभापती राजेंद्र नाटकर, भाजपा सरचिटणीस प्रा.सुनील नेवे, प्रमोद नेमाडे, महेंद्रसिंग ठाकूर, पिंटू कोठारी, किरण कोलते, अॅड.बोधराज चौधरी, पुरूषोत्तम नारखेडे, देवा वाणी, वसंत पाटील, गिरीश महाजन, राजेंद्र आवटे, राजू सूर्यवंशी, अमोल इंगळे, राजू खरारे, बापू महाजन, सतीश सपकाळे यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.