भुसावळकरांना दिलासा ; बंद पथदिव्यांची अखेर दुुरुस्ती

0

भुसावळ- शहरातील मुख्य मार्गावर पालिकेच्या माध्यमातून लावण्यात आलेले एलईडी पथदिवे देखभाल-दुरुस्तीअभावी बंद पडले होते. याबाबत ‘दैनिक जनशक्ती’ने वृत्त प्रसिद्ध केले होते. याची पालिका प्रशासन व नगराध्यक्ष रमण भोळे यांनी गांभीर्याने दखल घेत कंत्राटदाराला पथदिवे दुरुस्तीच्या सूचना केल्या होत्या. कंत्राटदाराने गुरुवारी व शुक्रवारी दोन दिवसात 65 पथदिव्यांची दुरूस्ती केली तसेच काही बंद एलईडी दिवे काढल्याने शहरातील रस्ते पूर्ववत उजळल्याने शहरवासीयांना दिलासा मिळाला आहे. जामनेर रोडसह यावल रोडवर एलईडी दिवे लावल्यानंतर अवघ्या काही महिन्यातच हे एलईडी दिवे बंद झाल्याने शहरवासीयांसह वाहनधारकांची गैरसोय होत होती. कंत्राटदाराने दोन दिवसात 65 पथदिवे नवीन बसवून शहरवासीयांना दिलासा दिल्याने समाधान व्यक्त होत आहे.