जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांचे प्रतिपादन
भुसावळ- जिल्हा पोलीस दलाने आयोजित केलेल्या ‘रन भुसावळ रन’ स्पर्धेत भुसावळकरांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद निश्चितच कौतुकास्पद असून अशाच पद्धत्तीने शहरवासीयांनी दररोज धावावे व आरोग्य सुदृढ ठेवावे जेणेकरून आमच्या पोलीस दलावरीलही ताण कमी होण्यास मदत होईल, अशी भावना जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी व्यक्त केले. रन फॉर भुसावळच्या शुभारंभापूर्वी त्यांनी धावपटूंसह उपस्थितांना मार्गदर्शन केले. शहरवासीयांनी शहरात नेहमीच एकजूट दाखवून जातीय सलोखा अबाधीत ठेवावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
स्पर्धेला भरभरून प्रतिसाद -नीलोत्पल
जिल्हा पोलीस दलाने आयोजित केलेल्या या स्पर्धेत मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद निश्चितच कौतुकास्पद आहे. शहराच्या शांततेसाठी, स्वच्छतेसाठी व उत्तम आरोग्यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आल्याची भावना भुसावळचे सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, या स्पर्धेसाठी एक हजार स्पर्धकांची आम्हाला अपेक्षा होते मात्र तब्बल एक हजार 250 स्पर्धकांनी नोंदणी करून आमचाही आत्मविश्वास वाढवला असल्याचे त्यांनी सांगितले.
या मान्यवरांची उपस्थिती
आमदार संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे, उपनगराध्यक्ष लक्ष्मी मकासरे, सिद्धीविनायक ग्रुपचे संचालक कुंदन ढाके, उद्योजक मनोज बियाणी, डीआरएम आर.के.यादव, रेल्वेचे एडीआरएम मनोज सिन्हा, रेल्वेचे सिनी.डीईएन एम.एस.तोमर, दीपनगरचे मुख्य अभियंता आर.आर.बावस्कर, एजीएम सुधीर मलिक, कर्नल निंबाळकर, भुसावळ ऑर्डनन्सचे जनरल मॅनेजर राजीव पुरी, वरणगाव ऑर्डनन्सचे जनरल मॅनेजर एस.चॅटर्जी, वरणगाव ऑर्डनन्सचे कर्नल राणा, आयएमएचे अध्यक्ष डॉ.सुनील पाटील तसेच पोलीस अधिकार्यांमधून चाळीसगाव विभागाचे अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, डीवायएसपी धनंजय पाटील, जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ निरीक्षक सुनील कुराडे, बाजारपेठ निरीक्षक चंद्रकांत सरोदे, शहरचे प्रभारी निरीक्षक दीपक गंधाले, सहा.निरीक्षक मनोज पवार, राहुल पाटील, उपनिरीक्षक सचिन खामगड, विशाल पाटील, नशिराबादचे आर.टी.धारबडे यांच्यासह अन्य अधिकार्यांची उपस्थिती होती. महिलांमधून आमदारांच्या पत्नी रजनी सावकारे, संगीता बियाणी, ताप्ती स्कूलच्या प्राचार्य नीना कटलर यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.