बंधार्यात पाणी पोहोचण्यास लागणार तीन दिवसांचा अवधी
भुसावळ : थकबाकीअभावी आवर्तन सोडण्यास विलंब करणार्या पाटबंधारे विभागाने अखेर बुधवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास हतनूर धरणातून आवर्तन सोडल्याने शहरवासीयांना दिलासा मिळाला आहे.
असे असलेतरी धरणातील पाणी बंधार्यापर्यंत पोहोचण्यासाठी किमान तीन दिवसांचा अवधी लागणार असल्याने तो पर्यंत मात्र शहरवासीयांना टंचाईच्या झळा सोसाव्या लागणार आहेत. बुधवारी पाटबंधारे विभागाचे मुख्य अभियंता संदेश कुलकर्णी यांच्या दालनात नगराध्यक्ष रमण भोळे, कार्यकारी अभियंता सी.एच.विचवे, भुसावळ रेल्वेचे डीएमओ भंगाळे यांच्या उपस्थितीत बैठक होवून विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.