भुसावळ : आशियाई ट्वेन्टी-20 क्रिकेट महासंघातर्फे श्रीलंका येथे नुकत्याच पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी-20 क्रिकेट स्पर्धेत भुसावळ येथील उदयोन्मुख खेळाडू दर्पण भावसार नेत्रदिपक कामगिरी करत चमकला. श्रीलंकेतील कोलंबो येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत दर्पणने सहा सामन्यात ऑफ स्पिन गोलंदाजीच्या जोरावर 11 बळी घेतले. व बॅटींग करतानाही 135 धावा पटकावल्या.
मुरलीधरणकडून घेतले क्रिकेटचे धडे
या स्पर्धेदरम्यान दर्पणची ऑफ स्पीन गोलंदाजी बघून श्रीकलंकेचा विश्वविक्रमी गोलंदाज मुथैय्या मुरलीधरण याने दर्पणचे कौतुक करीत गोलंदाजीचे टिप्स दिले. व क्रिकेट जगातील अनुभव सांगितले. क्रिकेटमध्ये शिखय गाठायचे असेल तर मेहनत, जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास हे अत्यंत आवश्यक असल्याचेही मुरलीधरण याने दर्पणला सल्ला दिला.
डिवायएसपींकडून गौरव
त्याचा नुकताच कार्यक्रमात डिवायएसपी निलोत्पल, राज्य ट्वेन्टी-20 क्रिकेट संघटनेचे सचिव वासेफ पटेल, क्रिकेट प्रशिक्षक राहुल कोळी यांनी दर्पणचा गौरव केला.
खेळाला प्राधान्य देणार
दरम्यान भुसावळ स्पोर्टस अॅकडमीचे अध्यक्ष प्रमोद सावकारे यांनी तालुक्यातील उदयोन्मुख खेळाडूंसाठी अॅकडमीचे माध्यमातून विविध स्पर्धात्मक उपक्रम राबविण्यात येणार असून याद्वारे ग्रामीण भागातील होतकरु विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी खेळाला प्राधान्य देण्याचे दर्पणचा गौरव करताना सांगितले. तसेच दर्पण भावसारला आपल्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.